भूगोल ,माध्यमिक साठी

 पृथ्वीवरील अक्षांश व रेखांश बद्दल माहिती

  • पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चिती करण्याकरिता अक्षांश व रेखांश यांचा आधार घेतला जातो.
  • उत्तर व दक्षिण ध्रुव – पृथ्वीच्या आसाची दोन टोके म्हणजेच उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव होय. पृथ्वीचे जे टोक ध्रुव तार्‍याकडे आहे. त्याला उत्तर ध्रुव म्हणतात व खालच्या टोकाला  दक्षिणध्रुव असे म्हणतात.
  • उत्तर व दक्षिण गोलार्ध – पृथ्वीच्या आसाला काटकोनात छेद दिल्यास पृथ्वीचे दोन भाग तयार होतात. या दोन भागापैकी उत्तर ध्रुवाकडील भागास उत्तर गोलार्ध व दक्षिण ध्रुवाकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.
  • विषवृत्त – उत्तर व दक्षिण गोलार्ध जोडणार्‍या मध्यवर्ती काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात विषुववृत्त हे पृथ्वीवरील सर्वात मोठे वर्तुळ होय. विषवृत्तालाच पृथ्वीचा परीघ असेसुद्धा म्हणतात.
  • अक्षांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषववृत्ताला समांतर दर एका अंशावर काढलेल्या काल्पनिक वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्ते म्हणतात. उत्तर गोलार्धातील रेषांना उत्तर अक्षांश व दक्षिण गोलार्धातील रेषांना दक्षिण अक्षांश असे म्हणतात. अक्षवृत्ताचे विषुववृत्तावरील स्थान 0° अक्षवृत्त मानले जाते, तर दक्षिण ध्रुवावरील स्थान 90° दक्षिण अक्षांश व उत्तर ध्रुवावरील स्थान 90° उत्तर अक्षांश असे मानले जाते.
  • रेखांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषुववृत्ताला काटकोनात छेदून जाणार्‍या व एक अंश अंतरावर काढण्यात आलेल्या काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषेला रेखावृत्त म्हणतात. मूळ रेखावृत्त (0° रेखावृत्त) इंग्लंड जवळील ग्रीनवीच या बेटावरुन गेलेले आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेस व पश्चिमेस दर एक अंश अंतरावर याप्रमाणे 180° पश्चिम आणि 180° पूर्व अशी एकूण 360 रेखावृत्ते मानली गेलेली आहेत. ग्रीनवीचच्या पूर्वेकडील रेखावृत्तांना पूर्व रेखावृत्त व पश्चिमेकडील रेखावृत्तांना पश्चिम रेखावृत्त असे म्हणतात. विषुववृत्तावर दोन रेखावृत्तामधील अंतर 111 किलोमीटर असून ध्रुवाकडे जातांना हे अंतर कमी कमी होत जाते व ध्रुवावर शून्य होते. कारण सर्व रेखावृत्ते दोन्ही ध्रुवावर एकत्र येतात.
  • स्थाननिश्चिती – पृथ्वीवरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते या दोहोंच्याही सहाय्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चित करता येते.
                                                                                        वाचून झाल कि आपल्या मित्र ,मैत्रीणीना पाठवा



भारताची सामान्य माहिती

  • भारताचे क्षेत्रफळ : 32,87,263 चौ.कि.मी.
  • भारताची लांबी (दक्षिण-उत्तर) : 3,214 कि.मी.
  • भारताची रुंदी (पूर्व-पश्चिम) : 2,933 कि.मी.
  • भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भू भागाशी प्रमाण : 23%
  • भारताच्या भू-सीमा : 15,200 कि.मी.
  • भारताला स्पर्श करणारे एकूण देश : सात
  • भारताची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 121,01,93,422
  • भारताची पुरुष संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 62,37,24,248
  • भारताची स्त्री संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 58,64,69, 174
  • भारताचा साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 74.04%
  • पुरुष साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 82.14%
  • महिला साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 64.46%
  • भारताची घनता सन 2011 च्या जनगणनेनुसार : 382 प्रति चौ.किमी.
  • भारतास लाभलेला समुद्रकिनारा : 7,517 कि.मी.
  • भारताची राजधानी : दिल्ली
  • भारताचे राष्ट्रगीत : जन-गण-मन
  • भारताचे ध्येय वाक्य : सत्य मेव जयते
  • राष्ट्रीय गीत : वंदेमातरम
  • ‘जन-गण-मन’ या राष्ट्रगीताचे कवि : रविंद्रनाथ टागोर
  • राष्ट्रीय गीत ‘वंदेमातरम’ चे कवी : बंकीमचंद्र चटर्जी
  • भारताचा राष्ट्रध्वज : तिरंगी झेंडा
  • राष्ट्रीय फळ : आंबा
  • राष्ट्रीय फूल : कमळ
  • भारताचा राष्ट्रीय पक्षी : मोर
  • भारताचा राष्ट्रीय प्राणी : वाघ
  • भारतात एकूण घटक राज्ये : 29
  • भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश : 7
  • भारतात सर्वाधिक साक्षर राज्य : केरळ
  • भारतात सर्वात कमी साक्षर राज्य : बिहार
  • भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रदेश : राजस्थान
  • भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा : ठाणे (महाराष्ट्र)

  • भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे                                                                                 
      
                बंदरे – राज्य 
    • कांडला : गुजरात

    • मुंबई : महाराष्ट्र

    • न्हाव्हाशेवा : महाराष्ट्र

    • मार्मागोवा : गोवा

    • कोचीन : केरळ

    • तुतीकोरीन : तमिळनाडू

    • चेन्नई : तामीळनाडू

    • विशाखापट्टणम : आंध्रप्रदेश

    • पॅरादीप : ओडिसा

    • न्यू मंगलोर : कर्नाटक

    • एन्नोर : आंध्रप्रदेश

    • कोलकत्ता : पश्चिम बंगाल

    • हल्दिया : पश्चिम बंगाल

भारतातील जंगलाविषयी माहिती

भारत सरकारच्या वन व पर्यावरण विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार भारतातील 78 लाख 29 हजार चौ. हेक्टर जमिनक्षेत्र वनाखाली असून भारताच्या एकूण जमिनक्षेत्राच्या 23.81 जमिनक्षेत्र जंगलाखालील आहे.भारतातील 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाचा विचार केल्यास काही राज्यामध्ये जंगलाचे प्रमाण कमी झाले असून काही राज्यामध्ये जंगलाचे प्रमाण वाढलेले आहे.

भारतातील जंगलाचे प्रमाण व राज्ये :

आकारमानानुसार सर्वाधिक जंगल असलेले राज्य –

  • भारतात सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण मध्यप्रदेश राज्यात (94,689 चौ.कि.मी.) असून दूसरा क्रमांक आंध्रप्रदेश (63,814 चौ.कि.मी.) राज्याचा आणि तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा (61,939 चौ.कि.मी.) लागतो.

क्षेत्रफळानुसार जंगलाचे प्रमाण जास्त असलेले राज्य –

  • क्षेत्रफळानुसार सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण सिक्कीम (82.31%) राज्यात आहे. त्यानंतर अनुक्रमे दूसरा क्रमांक मिझोरम (79.30%) व तिसरा क्रमांक मणीपुर (78.01%) लागतो. केंद्रशासीत प्रदेशात सर्वाधिक जंगले लक्षव्दिप बेटामध्ये आहे.

सर्वात कमी जंगल नसलेले राज्य –

  • हरियाणा राज्यामध्ये सर्वात कमी जंगले असून हरियाणामधील फक्त 3.53% जमीन जंगलाखाली आहे. त्यानंतर अनुक्रमे पंजाब (6.12%) व बिहार (6.87%) जमीन जंगलाखाली आहे.

भारतातील प्रमुख जिवारण्ये :

  • निलगिरी – तामीळनाडू, कर्नाटक व केरळ राज्यांमिळून
  • नंदादेवी – उत्तराखंड
  • मानस – आसाम
  • सुंदरबन – पश्चिम बंगाल
  • मन्यार खाडी – तामीळनाडू
  • पंचमढी – मध्यप्रदेश
  • कच्छ – गुजरात
  • ग्रेट निकोबार – अंदमान व निकोबर


Comments